14 वर्षाखालील मुलांचा हॉकी संघ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी टिकमगडकडे रवाना
बुलढाणा (जिमाका), दि. 22 : १४ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी
जिल्ह्यातील हॉकी संघ मध्यप्रदेशातील टिकमगड येथे शनिवारी (दि. २०) रवाना झाला.
महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत क्रीडा व युवक सेवा
संचालनालय यांच्या आदेशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ व्या राष्ट्रीय शालेय हॉकी (१४ वर्षाखालील मुले)
स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १६ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत
सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिरात १८ खेळाडू व १ क्रीडा मार्गदर्शक सहभागी झाले
होते. खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे करण्यात आली
होती. क्रीडा मार्गदर्शक अनिकेत मोरे व श्री. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी
कसून सराव केला.
राष्ट्रीय शालेय हॉकी (१४ वर्षाखालील मुले) क्रीडा स्पर्धा टिकमगड
(मध्यप्रदेश) येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्याचा हॉकी संघ दि.
२० डिसेंबर २०२५ रोजी रवाना झाला. संघाच्या रवाना प्रसंगी बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह
सोसायटीच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल झंवर, सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य स्वामी,
सय्यद ऑफिस, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा अधिकारी तथा संघ व्यवस्थापक
आर. आर. धारपवार व सुहास राऊत यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
०००००

Comments
Post a Comment