रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट कंपनीत गुंतवणूक प्रकरणी फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखाकडे संपर्क करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 4:
रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट या दोन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. फिर्यादी तसेच साक्षीदारांकडून या दोन कंपनीमध्ये पैसे गुंतवलेला संदर्भातील आवश्यक
पुरावे व कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात स्वत: हजर राहून तक्रार नोंदविण्याचे
आवाहन आर्थिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी केले आहे.
मेहकर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 713/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता
2023 मधील कलम 316(2), 316(5), 318(4) तसेच MPID Act 1999 च्या कलम 3 आणि 4 प्रमाणे
आर्थिक गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे. सदर
गुन्हा रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट या दोन कंपन्यांमध्ये फिर्यादी
तसेच साक्षीदारांनी केलेल्या गुंतवणुकीबाबत झालेल्या फसवणुकीशी संबंधित आहे. गुंतवणूक
करूनही परतावा न मिळाल्याने तक्रार दाखल करण्यात आली. हा तपास आर्थिक गुन्हे शाखा,
बुलडाणा यांच्या अखत्यारीत करण्यात येत आहे.
गुन्ह्यातील प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये जोत्सना विठ्ठल सांगोळे, विठ्ठल धोंडूजी
सांगोळे, दत्तात्रय अंभोरे, अंजली दत्तात्रय अंभोरे आणि अभिजीत वासुदेव ताकवाडे यांचा
समावेश असून त्यांनी दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतविलेला पैसा परत मिळावा यासाठी तक्रारी
दाखल केल्या आहेत. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कार्यवाही आर्थिक गुन्हे शाखेद्वारे
करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
00000
Comments
Post a Comment