जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात मोटारसायकल रॅली
बुलडाणा,
(जिमाका) दि. 5: जागतिक
एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था तसेच जिल्हा
सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात जनजागृतीसाठी
मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीची
सुरुवात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते हिरवा झेंडा
दाखवून करण्यात आली. सदर
मोटारसायकल रॅलीस वै. अ. जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा डॉ. दिनकर खिरोडकर, कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद टाले, जिल्हा पीपीएम समन्वयक सिद्धेश्वर. ना.सोळुकी, जिल्हा समन्वयक अनिल श्रींराम सोळंके, जिल्हा
पर्यवेक्षक गजानन देशमुख उपस्थित होते.या रॅलीच्या माध्यमातुन एड्सविषयी जनजागृती तपासणीचे
महत्त्व, उपचारांची उपलब्धता आणि एचआयव्हीग्रस्तांबाबत सहानुभूतीचा संदेश
नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश होता.
ही
रॅली जिल्हा रुग्णालय परिसरातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत
जनजागृतीपर संदेश देत पूर्ण झाली. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व
माध्यम अधिकारी, आरोग्य कर्मचारी, एनजीओ प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच स्थानिक
नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात
एड्स प्रतिबंधासाठी “लवकर
तपासणी,नियमित उपचार,शून्य भेदभाव” हा संदेश
देत एचआयव्ही/एड्सविषयीचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन करण्यात आले.
00000




Comments
Post a Comment