नगरपरिषद निवडणूक : देऊळगाव राजात ७१.६७ टक्के मतदान

 


Ø  मतदान प्रक्रिया शांततेत

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 21 : राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारी कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदासाठी आणि खामगाव, शेगांव व जळगाव जामोद नगरपरिषदमधील ७ प्रभागातील सदस्य पदासाठी शनिवारी २० डिसेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

 

देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणुकीत ७१.६७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात एकूण २९ हजार ३२६ मतदारांपैकी २१ हजार १७ मतदारांनी मतदान केले. तर खामगाव नगरपरिषदेमधील ५ अ, ७अ, ९ ब आणि १६ ब या प्रभागात ६०.०९ टक्के मतदान झाले असून एकूण १७ हजार १४७ मतदारांपैकी १० हजार ३०४ मतदारांनी मतदान केले. शेगाव नगरपरिषदेमधील ४ अ आणि  ४ ब या प्रभागमध्ये  ६९.६७ टक्के मतदान झाले असून एकूण ३ हजार ६७९ मतदारांपैकी २ हजार ५६३ मतदारांनी तर जळगाव जामोद नगरपरिषेतील ६ अ, ६ ब आणि  ७ ब या प्रभागात ६५.५३ टक्के मतदानाची नोंद झाली असून एकूण ४ हजार ९७३ मतदारांपैकी ३ हजार २५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

 

देऊळगाव राजा नगरपरिषेतील १० प्रभाग आणि  खामगाव ४, शेगाव १ आणि जळगाव जामोद नगरपरिषेतील ३ अशा एकूण १७  प्रभागातील ३० सदस्य पदासाठी आणि एका अध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. यात एकूण ५५ हजार १२५ मतदार असून त्यापैकी ३७ हजार १४३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १९ हजार ४८७ पुरुष तर १७ हजार ६५६ महिला मतदारांचा समावेश आहे.

 

या निवडणुकीत एकूण ५८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती दिली असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या