जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा Ø उत्कृष्ट भाषण, गीतगायन करणाऱ्या विद्यार्थीनींचा गौरव
बुलढाणा,
(जिमाका) दि. 18: जिल्हा अल्पसंख्याक
कक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी
उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे होते.
यावेळी जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी राहुल पवार, प्रा. एस. पी. हिवाळे, जितेंद्र जैन,
ॲड वसिम कुरेशी, फादर रजनीकांत सोनावणी, इरफान उल्ला खान, अरविंद जैतपाल, संजय जाधव,
शेख चॅंाद शेख गुलाब, काझी रईसउदीन, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी
उपस्थित होते. तसेच नगरपरिषद उर्दू शाळेतील विद्यार्थीनींच्या उत्कृष्ट भाषण व गीतगायनाने
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे यांच्या हस्ते शालेय भाषण व गीतगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थींनींना
पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी
राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस देशभरात साजरा केला जात असल्याचे नमूद करून हा दिवस
आनंदाचा असून अशा उपक्रमांतून एकतेचा संदेश दिला जात असल्याचे सांगितले. अल्पसंख्याक
समाजाच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले.
या कार्यक्रमात प्रा. एस.
पी. हिवाळे, ॲड वसिम कुरेशी, फादर रजनीकांत सोनावणी, इरफान उल्ला खान, अरविंद जैतपाल,
संजय जाधव, शेख चॅंाद शेख गुलाब, काझी रईसउदीन यांनी देखील मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात
जिल्हा व्यवस्थापकांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जैन आर्थिक विकास
महामंडळ आणि शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या योजनांची माहिती
दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी राहुल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र
सोभागे यांनी तर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उल्का राणे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
००००००




Comments
Post a Comment