नगरपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्यात लोकशाही दिनाचे आयोजन नाही
बुलढाणा, (जिमाका) दि. 9: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरीत आदर आचारसंहिता लागू असल्यामुळे डिसेंबर
महिन्यात जिल्हास्तरिय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
सुरेश कव्हळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या
पहिल्या सोमवारी जिल्हास्तरिय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू शासन परिपत्रकान्वये
ज्या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु करण्यात
आली आहे. अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये, असे निर्देश देण्यात आले
आहेत. त्यानुषंगाने डिसेंबर महिन्याचा जिल्हास्तरिय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार
नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
0000000
Comments
Post a Comment