साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना एक लाखांपर्यंत कर्ज ; 29 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
बुलढाणा, दि. 26 :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज
योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत मातंग समाजातील पात्र अर्जदारांना एक
लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेसाठी दि. 29 डिसेंबर 2025
ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत बुलढाणा
जिल्हा कार्यालयास सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 50 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट
ठेवण्यात आले आहे. प्रकल्प मर्यादा रुपये एक लाख रुपये असून त्यापैकी 10 हजार
रुपये अनुदान, 5 टक्के अर्थात 5 हजार रुपये लाभार्थी सहभाग व उर्वरित 85 हजार
रुपये महामंडळाचे कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. योजनेचे आर्थिक उद्दिष्ट 50 लाख
रुपये आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मातंग
समाजातील 12 पोटजातींतील इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे, वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे,
तसेच यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचा
सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 असणे आवश्यक आहे.
अर्ज स्वतः अर्जदाराने, आवश्यक कागदपत्रांसह दोन प्रतींमध्ये जिल्हा कार्यालयात
सादर करायचे असून त्रयस्थ/मध्यस्थामार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
आवश्यक
कागदपत्रे :
जातीचा दाखला, उत्पन्नाचा
दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, घरटॅक्स पावती, कोटेशन,
व्यवसायाच्या जागेचा पुरावा, ग्रामपंचायत/नगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप
अॅक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान/कर्ज न
घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, आधार-संलग्न बँक खात्याचा तपशील आदी. प्राप्त अर्जांची
निवड लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेनंतर मा. उपजिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) करण्यात येईल. निवडीनंतर वैधानिक
दस्तऐवजांची (एक जामीनदारासह) पूर्तता झाल्यावर कर्ज वितरण केले जाईल. महामंडळाच्या
विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डि. एस.
पाखमोडे यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment