श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त प्रभात फेरी
बुलडाणा, (जिमाका) दि. 4:
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त
शीख-सिकलीकर, सिंधी व इतर सर्व समाजबांधवांनी बुलढाणा शहरात सोमवारी मोठ्या उत्साहात
प्रभात फेरी काढली.
या प्रभात फेरी अगोदर श्री गुरु तेग बहादूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील जांभरुण रोड गुरुद्वारापासून संगम चौक,
जयस्तंभ चौक, स्टेट बॅंक चौक ते तहसिल चौक या मार्गांवर प्रभात फेरी काढून प्रार्थना
गीत, भजन व कीर्तन, चित्ररथाद्वारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार
करण्यात आला.
यावेळी शहरातील पंजाबी, शीख, सिंधी
समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
००००




Comments
Post a Comment