चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात शेतकरी, विद्यार्थ्यांना ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे धडे
बुलढाणा, (जिमाका) दि. 10:
कृषी विभाग, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय, चिखली आणि कॉन्फ्लाय डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त
विद्यमाने कृषी कीटकनाशक फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले.
जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हे ड्रोन
प्रात्यक्षिक दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रात्यक्षिकादरम्यान
कॅानफ्यायच्या तज्ञांनी प्रिसिजन फवारणी, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांना
मिळणारे आर्थिक फायदे यांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अरुण ना. नन्हई,
व्यवस्थापकिय संचालक सुभाष कस्तुरे, नोडल अधिकारी प्रा. डॉ. अश्विन ग. घायसुंदर तसेच
शेतकरी, विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंटर ऑफ
एक्सिलेंसची स्थापना
अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,
चिखली आणि कॉन्फ्लाय डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यात अत्याधुनिक ड्रोन
एआय ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सिलेंस हे केंद्र स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य
करार करण्यात आला. त्यानुसार अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय चिखली
येथे अत्याधुनिक ड्रोन एआय ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सिलेंसची स्थापना करण्यात
आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
००००




Comments
Post a Comment