जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू
पशुपालकांनी ऑनलाइन अर्ज
करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका)
दि. ४: जिल्ह्यात दुध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक
दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे
या उद्देशाने विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ सुरू करण्यात आला आहे.
विदर्भ व मराठवासा दुग्धविकास प्रकल्प टप्पा-१ प्रकल्पातून मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
शासन निर्णय दिनांक १६ सप्टेंबर २०२४ अन्वये टप्पा-२] राबविण्यास महाराष्ट्र शासनाने
मंजुरी प्रदान केली आहे. सदर प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातील सर्व
१२ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे
या प्रकल्पांतर्गत उच्च
दुध उत्पादनक्षम गाई–म्हशी उपलब्ध करून देणे, वंधत्व निर्मूलन, पशुपालनासाठी आधुनिक
सुविधा पुरविणे, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, चारा पिके व पोषक खाद्य
उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे अशी प्रमुख उद्दिष्टे निर्धारित
करण्यात आली आहेत.
अनुदान व सुविधा
या प्रकल्पांतर्गत पशुपालकांना विविध अनुदानांचा लाभ मिळणार आहे. उच्च
दुध उत्पादन क्षमतेची दुधाळ जनावरे 50 टक्के अनुदानावर, तर भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या
उच्च उत्पादनक्षम कालवडी 75 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत. पशुप्रजनन पूरक खाद्य
आणि दुधातील फॅट व एसएनएफ वाढविणारे खाद्य 25 टक्के अनुदानावर उपलब्ध करण्यात येणार
आहे. बहुवार्षिक चारा पिकांस 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून मुरघास खरेदीसाठी
प्रति किलो तीन रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय विद्युत कडबाकुट्टी यंत्र 50
टक्के अनुदानावर उपलब्ध होणार असून वंधत्व निवारण व आधुनिक प्रशिक्षण सुविधा शेतकऱ्यांना
विनामूल्य देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vinddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन
अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. अमितकुमार
दुबे यांनी केले आहे. तसेच योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ.
रवी मुसळे किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी
(विस्तार), पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
website tar barobar taka, open nahi hot aahe, lokana pagal banvta ka?
ReplyDelete