जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

 



 

Ø  जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 17: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे.  या सप्ताहात नागरिकांना शासकीय सेवा पुरविण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी देखील निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

या सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा बुधवारी जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.

 

या सुशासन सप्ताह दरम्यान नागरिकांना शासकीय सेवा पुरविणे, आपले सरकार व पीजी पोर्टल आणि कार्यालयातील तक्रारींचे निरसन करणे, शासकीय योजनांबाबत जनजागृती करणे, विशेष शिबिरांचे आयोजन करणे, नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करणे, एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतीमान करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, तहसिलदार संजीवनी मुपडे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थिते होते.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या