राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
· विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालाव...