Posts

Showing posts from 2025

बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

Image
  बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया ’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात   बुलडाणा, (जिमाका) दि. 19 :   जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी 16 जून ते 31 जुलै 2025 दरम्यान ‘स्टॉप डायरिया ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ स्थानिक नागरी आरोग्य केंद्र, बुलढाणा येथे उत्साहात पार पडला.   उद्घाटन सोहळ्याला जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जवरे, डॉ. सपना मोरे, डॉ. शाकीर यांची उपस्थिती होती. यावेळी आशा स्वयंसेविकांनी ORS (ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन) चे प्रात्यक्षिक करून अतिसारामुळे शरीरातील होणाऱ्या जलशुष्कतेपासून बचाव कसा करता येतो, हे प्रत्यक्ष दाखवले. कार्यक्रमास दीपक महाले (IFM), गणेश परिहार (TSA), पूजा जाधव (LHV), आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील गाव व शहरी भागातील अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे व शासकीय संस्था यामधील 0 ते 5 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अ...

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना; एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

  इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना; एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 19 :   केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांच्यांतर्गत एकूण 52 हजार 365 लाभार्थी केंद्र शासनाच्या NSAP पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. परंतु त्यापैकी 5 हजार 137 लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित असल्याने योजनेचा लाभपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी NSAP पोर्टलवर तातडीने आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   डिसेंबर 2024 पर्यंत लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या अनुदानाचा हिस्सा (₹200/₹300/₹500) NSAP पोर्टलमार्फत तर राज्य शासनाचा हिस्सा (₹1300/₹1200/₹1100) तहसील कार्यालयामार्फत BDS प्रणालीने खात्यात जमा करण्यात येत होता. परंतु, जानेवारी 2025 पासून राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाच्या नव्या धोरणानुसार अनुदानाचा राज्य हिस्सा थेट लाभार्थ्य...

निमगाव वायाळ तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित*

  निमगाव वायाळ तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित*   बुलडाणा, (जिमाका) दि. 19 :   शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केलेले आहे. त्यानुसार सन 2025-26 वर्षाकरिता, बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ 10 हेक्टर तलावाच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीनुसार तलाव मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दि. 24 जून 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा येथे सादर करावेत.   सन 2025-26 करीता बुलढाणा जिल्ह्यातील 10 हेक्टर क्षेत्रफळाचा निमगाव वायाळ तलाव मासेमारी ठेका दि. 30 जून 2025 रोजी संपुष्टात येत आहे. सदर तलावाच्या कार्यक्षेत्रातील योगेश मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. केशवशिवणी यांनी तलाव घेण्यास नकार दिल्यामुळे हा तलाव अन्य पात्र संस्थांना देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव सादर करावेत. ...

मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

  मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प जातीच्या अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा पावसाळी प्रजनन हंगाम जूलै 2025 पासून सुरु होत आहे.   मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर जि. बुलढाणा येथे 15 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मत्स्यकास्तकार, शेतकरी व सहकारी संस्थांनी मत्स्यबीजाची मागणी लेखीस्वरुपात नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु.ग. गावडे यांनी केले आहे. सर्व मच्छिमारी सहकारी संस्था आणि मत्स्यकास्तकारांनी फक्त शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रातूनच बीज खरेदी करणे बंधनकारक आहे. बीज खरेदीची पावती जवळ ठेवणे आवश्यक असून, ती कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक मानली जाणार आहे. बाहेरून, इतर जिल्हा किंवा राज्यातून, खाजगी मार्गाने बीज खरेदीसाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी अनिवार्य आहे. विनापरवानगी बीज खरेदी आढळून आल्यास शासन धोरणानुसार कारवाई केली जाईल. मत्स्यबीज संचयनाचे पंचनामे करणे बंधनकारक आहे. त्या...

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

  आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन बुलडाणा, दि. १८ (जिमाका): जिल्ह्यात येत्या २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व व्यापक सहभागासह साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर योगदिनाचे आयोजन अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात होण्यासाठी ‘माय भारत’ (My Bharat) आणि ‘योगसंगम’ (Yogsangam) या केंद्र शासनाच्या पोर्टल्सवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. योग हा भारताच्या प्राचीन व समृद्ध परंपरेचा अनमोल वारसा असून, शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी त्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. योगामुळे तणाव निवारण, आरोग्यसंपन्न जीवनशैली आणि एकाग्रतेचा विकास साधता येतो. योगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः युवक व विद्यार्थ्यांना, https://mybharat.gov.in या पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोंदणीमुळे योग दिनाशी संबंधित उपक्रमांमध...

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा

  जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा   बुलडाणा, (जिमाका) दि. 18 :   जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दि. 1 ते 3 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. 25 जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.   जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या मार्फत 2025-26 या वर्षासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर 15 वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू दि. 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 वर्षाखालील मुले, मुली दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.             जिल्हास्तरीय...

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

  कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी बुलढाणा, दि.18 (जिमाका): नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या "कायाकल्प पुरस्कार योजना 2024-25" अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांनी उत्कृष्ट कामगिरी करून विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये यामध्ये मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळ या संस्थेला जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून 2 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील उपकेंद्र, राजेगाव या संस्थेला उपकेंद्र श्रेणीत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल 1 लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मलकापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास प्रोत्साहनपर बक्षीस स्वरुपात 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय, उत्कृष्ट कामगिरीबद्दल 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपये असे प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे. यामध्ये हातेडी, किन्होळा, ...

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

  आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन बुलढाणा,दि. 18 (जिमाका) : आदिवासी विकास विभागातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत समाविष्ट योजनांसाठी आदिवासी बांधवांनी दि. 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी मोहनकमार व्यावहारे यांनी केले आहे. या योजनांत 85 टक्के अनुदानावर वनहक्कधारक आदिवासी लाभार्थ्यांना काटेरी तार, आदिवासी शेतकऱ्यांना काटेरी तार, आदिवासी युवक-युवतींना पिठाची गिरणी, आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना खाद्य स्टॉल, आदिवासी शेतकऱ्यांना पावर डिलर, महिला-पुरुष बचत गटांना खाद्य स्टॉल, होजिअरी गारमेंटसाठी अर्थसहाय्य आदींचा समावेश आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर दि. 15 जुलै 2025 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. सदर योजनांमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बदल करण्याचा व कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे राखून ठेवलेला आ...

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; बुलडाण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

Image
  शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ;   बुलडाण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत   बुलडाणा,दि 18 : जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विश्वशांती विश्वपदयात्रा घेणारी पर्वतारोहींची चमू बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे. या विश्व पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवध बिहारी लाल यांच्या चमूने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली.   ही यात्रा डेंजर्स अ‍ॅडव्हेंचर्स अंतरवेद स्पोर्ट्सतर्फे राबविण्यात येत आहे. या चमूत जितेंद्र प्रताप, महेन्द्र प्रताप, गोविंदा नंद हे   पर्वतारोही सहभागी आहेत.   या यात्रेने आतापर्यंत ११ देशांमध्ये एकूण ४.४८ लाख किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला असून, २०१८ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. यात्रेच्या माध्यमातून १४ कोटी ५० लाख वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.   देशभरातील ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही पदयात्रा झाली असून, उत्तराखंड, मध्य...

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

  शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही   -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन   बुलढाणा, दि.18 (जिमाका) : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत प्रशासनाकडून शेतकरी माहिती संच तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) तयार केला जात असून, तो नसल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   बुलढाणा जिल्ह्यात अग्रीस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी दि. 12 डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये, तसेच 21 जानेवारी 2025 पासून नागरी सुविधा केंद्र व कॅम्प या हायब्रिड पद्धतीने सुरू आहे. या मोहिमेत आजअखेर 3,58,674 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.   दरम्यान, जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेचे एकूण 4,34,468 लाभार्थी आहेत. त्यापैकी फक्त 2,94,339 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत  बुलडाणा, दि. 17 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, बुलडाणा जिल्हा कार्यालयामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुणांनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह दि. 17 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड, बुलडाणा. येथे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. जे.एम. गाभणे यांनी क...

देऊळगाव राजा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  देऊळगाव राजा येथील शासकीय वसतिगृहात   प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन बुलडाणा, दि. (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग तसेच अनाथ विद्यार्थी यांना आरक्षित प्रवर्गानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. देऊळगाव राजा येथील नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या शाळांमधील शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून, अर्ज भरल्यानंतर त्याची मुळप्रत वसतिगृहात सादर करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी ही संधी मोठ्या संख्येने घेऊन प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन वसतिगृहाचे प्रभारी गृहपाल व्ही. आर. सोनवळ यांनी केले आहे. 0000

चिखलीतील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

  चिखलीतील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू बुलडाणा, दि. 17 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, चिखली येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ अशा विविध आरक्षित प्रवर्गांतील पात्र विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार असून, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट (हार्ड कॉपी) वसतिगृहात प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अथवा अर्जासंदर्भात मदतीसाठी संपर्क क्रमांक : ९५०३२२८९८२ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट वसतिगृहाला भेट ...

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

  शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन   बुलढाणा,दि. १७ (जिमाका) : महाराष्ट्रातील युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून घडवण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी केंद्रांमध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १९ वर्षांखालील पात्र खेळाडूंकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनी केंद्रे राज्यातील अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व पुणे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वीत आहेत. सदर ठिकाणी नविन प्रशिक्षणार्थीची निवड करणे प्रस्तावित आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये समावेश असलेले खेळ प्रकार: आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, जलतरण व फुटबॉल, ट्रायथलॉन, सायकलिंग अश्या १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. ...

घाबरू नका ! हातापायाला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य नाही ; आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु

  घाबरू नका ! हातापायाला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य नाही ; आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु ·          १४ रुग्णांना एक्झामा आजाराचे निदान ·            आजाराचा पाण्याशी कोणताही संबंध नाही ·          बाधितांना आजाराचा पूर्वइतिहास   बुलढाणा, दि.१७ : मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख या गावात हात व पायाच्या तळव्यांना भेगा पडत असलेले रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याशी कोणताही संबंध नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळल्यास डॅाक्टरांचा सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अमोल गिते यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांवअंतर्गत शेलगांव देशमुख या गावामध्ये अनेक व्यक्तींना तळहात व तळपायावर भेगा पडणे, साल जाणे, खाज येणे इत्यादी लक्षणे उद्भवत असल्याबाबत माहिती मिळताच उपकेंद्र शेलगांव देशमुख व आयु. दवाखाना शेलगाव देशमुख येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा यांचे ...

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू बुलडाणा,(जिमाका) दि.16 :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मोताळा येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षण टक्केवारीनुसार असेल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील मुलींना प्रवेशासाठी पात्रता दिली जाणार आहे. मोताळा नगर पंचायत हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये येथे शिक्षण घेणाऱ्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून, त्यासाठी   https://hmas.mahait.org   या लिंकचा वापर करावा. यासंदर्भात वसतिगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आह...

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू

  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू बुलडाणा,(जिमाका) दि.16 :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा बुलडाणा अधिनस्त 125 व्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मलकापूर जि.बुलडाणा येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता सरु करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील, अनु.जाती, अनु जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थीनी प्रवेशास पात्र असतील. शालेय, कनिष्ठ, विद्यालयीन व महाविद्यालयीन मलकापूर येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थीनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील. प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येईल. अर्ज भरण्याकरीता   https://hmas.mahait.org   या लिंकचा वापर करावा. याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थीनींनी प्रवेश अर्ज भरावे. तसेच अधिक माहिती करीता 9423761403 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वस...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू बुलडाणा,(जिमाका) दि.16 :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा (जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष   2025-2026 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ इत्यादी घटकांतील विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेस पात्रता आहे. नांदुरा नगरपरिषद हद्दीतील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना   https://hmas.mahait.org   या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क: 8975778949 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधाव...

लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Image
  लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील   ·          २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन ·          जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा   बुलढाणा, दि.16 (जिमाका): येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी   योग दिनाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांची सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी “ लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा ” असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.   या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार , उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत योग दिनाच्या आयोजनासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.   जिल्हाधिकारी डॉ.पाटील म्हणाले की, “ शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील अशा मोकळ्या आणि स...