Thursday 9 November 2023

जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामे नियमानेच

 

जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामे नियमानेच

 

बुलडाणा दि. 9 (जिमाका): जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता नियमानुसार  व जिल्हा नियोजन समितीच्या सूचनेनुसार देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.

 

जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता अर्थकारणाने विलंबाने वितरीत करण्यात आल्या असल्याचे वृत्तपत्रात टिकात्मक व नकारात्मक बातमी प्रसिध्द करण्यात आली आहे.  तथापि जिल्हा परिषद प्रशासनाकडुन पुढील वस्तुस्थितीदर्शक खुलासा केला आहे. ते याप्रमाणे:

 

जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांना जिल्हा नियोजन समितीव्दारे प्रशासकीय मान्यता प्रदान करुन त्याबाबतची कारवाई आय पास प्रणालीवर दि. 7 व 8 ऑक्टोंबर 2023 रोजी पुर्ण करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार निधीची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडील पत्रानुसार कामांना भविष्यात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कार्यात्तर मान्यता घेण्याचे अधिन राहुन प्रशासकीय मान्यता देण्यात यावे असे तत्कालीन पालकमंत्री यांच्या सुचना असल्याबाबत कळविले आहे. अद्याप जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नसुन आगामी काळात नियोजन समितीच्या सभेमध्ये कामांना कार्योत्तर मंजुरी घेण्यात येणार आहे. तद्वतच जनसुविधा, नागरी सुविधा व तिर्थक्षेत्र विकास कामांना संबधित ग्रामपंचायतीव्दारे ग्रामसभेमध्ये प्रशासकीय मान्यता घेण्यात येते.  त्यानंतर सदर कामांची अंदाजपत्रके तयार करुन पुढील कार्यवाही करण्यात येते. याबाबत दि. 12 ऑक्टोंबर 2023 व 3 नोव्हेंबर 2023 कालावधीत सर्व गट विकास अधिकारी यांना प्रस्तुत प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. कामे पुर्ण करण्यास मार्च 2025 पर्यंत शासनाची मुदत आहे. प्रशासकीय मान्यतेबाबतची प्रक्रीया ही ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते असून  प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यतेचे आदेश वाटप विभागप्रमुख करीत असतात त्यामुळे या कामांच्या अडथळा निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याबाबतची माहिती ऑनलाईन उपलब्ध असून त्याबाबत खात्री करता येते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यता वाटप करण्यात आलेल्या नाही अशा आशयाच्या वृत्ताचे प्रशासनाकडून खंडण करण्यात येत असून विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता नियमानुसार झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून पत्राव्दारे देण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment