Tuesday 7 November 2023

शासकीय व खाजगी बँकाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

शासकीय व खाजगी बँकाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

बुलढाणा दि. 7 (जिमाका):- जिल्हास्तरीय परामर्शदात्री समितीची सभा नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सप्टेंबर 2023 पर्यंतच्या जिल्हास्तरीय शासकीय व खाजगी बँकाच्या कामाचा आढावा घेऊन शासकीय व सामाजिक सुरक्षा योजनामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव उपस्थिती होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी निर्देश दिले की, शासन पुरस्कृत योजना व सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये खाजगी बँकाची प्रगती नगण्य असल्यामुळे त्यांनी ती त्वरीत सुधारावी. तसेच सर्व खाजगी बँका व बँक ऑफ बदोडा, बँक ऑफ महाराष्ट्र व इंडियन बँक यांनी प्रगती सुधारावे. लोवर इनकम ग्रुपमध्ये आवास वाढविणे तसेच पीएमएफएमई, पीएम स्वनिधी, सीएमईजीपी या योजनांचे उद्दीष्ट येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बँकेना दिलेत. खासदार प्रतापराव जाधव शासकीय मदतीला होल्ड लावू नये. तसेच लागलेला होल्ड त्वरीत काढण्याचे निर्देश बँकर्सला दिलेत.

 

अग्रणी जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी वार्षिक पत आराखड्याचा प्रोग्रेस  रिपोर्ट प्रस्तुत केला. सप्टेंबर 2023 पर्यंत एसीपीचे 72 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती दिली.  तसेच प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये 63 टक्के तर कृषि क्षेत्रामध्ये 66 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाल्याची माहिती श्री. हेडाऊ यांनी दिली.

000000

No comments:

Post a Comment