Monday 6 November 2023

मतदार जनजागृतीसाठी ब्रॅड अॅम्बेसेडरची नियुक्ती; नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करा-आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकर व मोनाली जाधव यांचे आवाहन

 

मतदार जनजागृतीसाठी ब्रॅड अॅम्बेसेडरची नियुक्ती;

नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करा-आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकर व मोनाली जाधव यांचे आवाहन

 

बुलढाणा दि. 6 (जिमाका):- नवीन मतदार नोंदणीचे प्रमाण वाढावे आणि जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक विभागाने जागतिक स्तरावरील सुवर्ण पदक विजेता आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकर व राष्ट्रीय राज्यस्तरीय विजेता आर्चरी खेळाडू कु. मोनाली  जाधव यांची ब्रॅड ॲम्बेसेडरची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील युवक, युवती व नागरीकांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रथमेश जावकर व कु. मोनाली  जाधव यांनी केले आहे.

 

निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नवीन मतदारांनी मतदान नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे आवाहन केले आहे.

 

नेमबाजीत अचुक नेम साधून माझ लक्ष साध्य केले त्याप्रमाणे आपणही लोकशाहीमध्ये आपल्या मताने देशाच्या विकासाचे लक्ष साध्य करण्यास सहाय्यभूत ठरू शकता. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आवाहन आहे की, आपले नाव या देशाचे मतदार म्हणून नोंदवा. आपण वयाची 18 वर्षे पुर्ण केलेली असतील किंवा दि. 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण होतील त्या महिन्यात नाव नोंदणी साठी अर्ज करू शकता.

 

नवमतदार म्हणून नावनोंदणी करणे अगदी सहज आणि सोप आहे.ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने आपली मतदार नोंदणी होवू शकता. ऑनलाईन नाव नोंदणी घरबसल्या करता येते. त्यासाठी voters.eci.gov.in या लिंकवर जावून आपल्या वयाचा पुरावा ज्यामध्ये जन्मप्रमाणपत्र, वाहन परवाना, आधार कार्ड, इयत्ता दहावी बोर्ड सर्टीफिकेट, पॅन कार्ड, पासपोर्ट व रहीवासी पुरावा म्हणून रेशनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना व आधार कार्ड यापैकी एक आपण नमुना सहा सोबत अपलोड करून ऑनलाईन मतदार नोंदणी करता येईल. ऑफलाईन मतदार नोंदणीसाठी आपल्या महाविद्यालय, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय यांचसोबत संपर्क साधून मतदार नोंदणी करता येईल.  चला तर मग नव मतदार म्हणून नाव नोंदणी करून भावी मतदार व लोकशाहीचे भक्कम आधार बनुया, असे आवाहन ब्रॅड अम्बेसेडर आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकर व मोनाली जाधव यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment