Thursday 9 November 2023

दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम; अन्नपदार्थ खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन

 

दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम;

अन्नपदार्थ खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन

 

बुलडाणा दि. 9 (जिमाका): सण उत्सवाच्या काळात नागरिकांना सकस व भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत स्वीटमार्ट, रेस्टारेंट तसेच किराणा दुकानाची तपासणी करण्यात येते आहे. या मोहिमेत आतापर्यंत खवा, मिठाई, फरसाण, आटा, रवा, मैदा व खाद्यतेल या अन्नपदार्थांचे 112 नमूणे विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त स. द. केदारे यांनी दिली.

 

अन्न व औषध कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत दुध व दुग्धजन्य पदार्थाचे 19 नमूने, घी, वनस्पती व खाद्यतेलाचे 13 नमूने, रवा मैदा व बेसनचे 16 नमूने व इतर अन्न पदार्थांचे 64 नमूने असे 112 नमूने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवालानुसार अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत संबधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.  

 

ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची काळजी

 

            ग्राहकांनी परवाना किंवा नोंदणीधारकाकडूनच अन्न पदार्थ खरेदी करावे. मिठाई खरेदी करतांना बेस्ट बिफोर डेट तपासून घ्यावी, सिलबंद अन्न पदार्थ घेतांना लेबलवरील मजकूर पाहूनच खरेदी करावे. अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी शंका असल्यास फुड सेफ्टी कनेक्ट ॲपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment