Thursday 23 November 2023

उमेदवारांचे परीक्षा शुल्क मिळणार परत

 


बुलडाणा, दि. 23 (जिमाका): जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सरळसेवा पदभरती 2019 साठी  जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण  भरती प्रक्रिया, ग्रामविकास विभाग यांच्या शासन निर्णय दि. 21 ऑक्टोबर 2022 अन्वये रद्द करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सन 2019 चे सरळसेवा पदभरती करीता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

सरळसेवा पदभरती सन 2019 व ऑगस्ट 2021 (अपंग  व इतर सुधारित आरक्षणासह) पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहेत.  त्यानुसार सरळसेवा पदभरती सन 2019 व ऑगस्ट 2021 आरक्षणासह) पदभरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे भरलेले शुल्क परत मिळविण्यासाठी http://maharsddzp.com या संकेतस्थळाला भेट देत संबंधित आवश्यक असलेली माहिती (उमेदवारांनी बँक खात्याचे विवरण व इतर अनुषंगिक माहिती) काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*******

No comments:

Post a Comment