Wednesday 22 November 2023

पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील यांचा आजपासून दोन दिवस जिल्हा दौरा

 बुलडाणा, दि. 22 (जिमाका): राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उद्या गुरुवार (दि.23)पासून दोन दिवस जिल्हा दौ-यावर येत आहेत.

पालकमंत्री श्री. वळसे -पाटील यांचे उद्या गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने बुलडाणा शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 9 वाजता आगमन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणीनिश्चिती व दुष्काळ व्यवस्थापन, जल जीवन मिशन, मजीप्राअंतर्गत कामाची प्रगती व पाणीटंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कृषी, तांडावस्ती आराखडा, रमाई घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना संदर्भातील बैठकीत आढावा घेतील.

त्याशिवाय सिंदखेडराजा, लोणार आणि शेगाव विकास आराखड्याबाबत जिल्हास्तरीय बैठक, जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा घेतील. जिल्हा दक्षता समिती व हुतात्मा स्मारकाबाबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम राहील.

दुस-या दिवशी शुक्रवार, (दि.24) रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ते दुपारी अडीच वाजता शासकीय विश्राम गृहाकडे प्रयाण करतील. त्यानंतर सोईनुसार समृद्धी महामार्गाने मंचर (जि. पुणे)कडे प्रयाण करतील.

*****  

No comments:

Post a Comment