Friday 10 November 2023

भरडधान्याचे आधारभूत किंमत जाहिर; भरडधान्य पिकांचे लागवड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

भरडधान्याचे आधारभूत किंमत जाहिर;

भरडधान्य पिकांचे लागवड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

बुलडाणा दि. 10 (जिमाका): केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम 2023-24 चे खरेदी योजनेंतर्गत भरडधान्याचे किमान आधारभुत किंमत जाहिर केले आहे. भरडधान्याला चांगला हमीभाव मिळत असून शेतकरी बांधवानी पारंपारिक पिका ऐवजी ज्वारी, बाजरी, मका व रागी पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

केंद्राने जाहिर केलेल्या आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्यात खरेद्री केंद्र सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल हमी भावापेक्षा कमी किंमतीत न विकता खरेदी केंद्रात विक्री करावी. अधिक माहितीसाठी स्थानिक जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.

 

भरडधान्याचे आधारभूत किंमत याप्रमाणे : ज्वारी संकरीत 3 हजार 180 रुपये, ज्वारी मालदांडी 3 हजार 225 रुपये, बाजरी 2 हजार 500 रुपये , मका 2 हजार 090 रुपये व रागी 3 हजार 846 रुपये आधारभूत किंमत जाहिर केले आहे.

000000

No comments:

Post a Comment