Thursday 9 November 2023

जादा दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर होणार कारवाई

 

जादा दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर होणार कारवाई

बुलडाणा दि. 9 (जिमाका): खासगी बससाठी कमाल भाडेदर शासन निर्णयाद्वारे निश्चित करून देण्यात आले आहेत. त्याहून अधिक दर आकारल्याचे आढळल्यास नागरिकांनी ऑनलाईन तक्रार द्यावी. अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

याबाबत दि. 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडे दर विचारात घेण्यात आले आणि खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हलकडून कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यासंदर्भात dyrto.28-mh@gov.in  ई-मेलवर तक्रार नोंदवावी.

0000

No comments:

Post a Comment