पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार
बुलडाणा,
दि. 23 (जिमाका): जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा पालकमंत्री दिलीप
वळसे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन भवन येथे शाल, श्रीफल, प्रशस्तीपत्र
आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी
खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड
आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी
अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित
होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांमध्ये अनुसयाबाई
संभाजी गवई, सुशिला भास्करराव देशमुख, मंगलाबाई माणकचंद बनवट, यशोदाबाई विठ्ठलराव
इंगळे, सुशीलाबाई विश्वनाथ अंजनकर, शोभा प्रभाकरराव चतून, सुमनबाई पांडूरंग पाटील,
बिसमिल्लाबी मोहम्मद हनीफ आणि सुनंदाबाई राजाराम पाठक यांचा समावेश होता.
*****
Comments
Post a Comment