Wednesday 22 November 2023

राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 डिसेंबर रोजी आयोजन

बुलडाणा, दि. 22 (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये दि. 9 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालत संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पक्षकारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी केले आहे.

 आपापसातील वाद-तंटे, प्रकरणे एकमेकांना विश्वासात घेवून मिटविल्यास आनंद निरंतर राहतो. त्यामुळे एकमेकांवर विजय मिळविण्याचा विचार करण्यापेक्षा तडजोड करून खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी होवून प्रेमाची सद्भावना निर्माण होते. या बाबीचा विचार करून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांच्या आदेशान्वये 9 डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्ण संधीचा फायदा पक्षकारांनी घेऊन एकमेकांविरुद्ध दाखल किंवा दाखलपूर्व प्रकरणे आपसांत तडजोडीद्वारे निकाली काढावी, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांनी केले.

 राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा येथे संपर्क साधावा जेणेकरुन  प्रकरण हे सामजस्याने निकाली निघेल व आपला वेळ आणि खर्च वाचेल, असेही त्यांनी सांगितले.

*****

No comments:

Post a Comment