Monday 20 November 2023

नारी शक्ती महिला सम्मान बचतपत्र योजनेत 8 डिसेंबरपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

 


बुलडाणा, दि. 20 (जिमाका): केंद्रीय अर्थसंकल्पात नारी शक्तीसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना जाहीर केली असून, 1 एप्रिल 2023 पासून ती टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 डिसेंबर 2023 पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन टपाल अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

या योजनेमार्फत महिला खातेदार स्वतः किंवा पालकांना आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे  1 हजार ते 2 लक्ष रुपये जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ व्याज मिळेल. त्यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत जोडावे लागेल. खातेदार दि. 31 मार्च 2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्याच्या अंतराने खाते उघडू शकतो.  या योजने अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व टपाल कार्यालयात दि. 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 “नारी शक्ती महिला बचतपत्र अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील  महिलांनी महिला सम्मान बचत पत्र योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment