Tuesday 28 November 2023

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा - सहायक आयुक्त प्रवीण खंडारे

 बुलडाणा, दि.28(जिमाका): राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून  तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

              कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे  दोन दिवसीय   मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध  क्षेत्रातील किमान 100 कंपन्या या  महारोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाची गरज असेलल्या कंपनी, उदयोजक आस्थापनांनी महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी  होऊन  रिक्तपदांबाबतची  माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन  नोंदवावी. त्यामुळे आवश्यक असणा-या मनुष्यबळाची  मागणी तातडीने पूर्ण होण्यास मदत होईल, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले आहे. 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन  नोंदणी करावी व मेळाव्यात स्वखर्चाने प्रत्यक्षपणे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

******


 

 

No comments:

Post a Comment