Thursday 30 November 2023

मतदान केंद्रांची डॉ. निधी पांण्डेय यांच्याकडून पाहणी



 बुलडाणा, दि. 30 (जिमाका):दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली.


            जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधा
र) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 182, 183 आणि 184ची पाहणी करत केंद्रप्रमुखांकडून मतदार यादी पुनरीक्षण आणि नवीन मतदार नावनोंदणी, वगळणी, मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली. तसेच जिजामाता महाविद्यालय येथील मतदान केंद्रांचीही पाहणी करत पुनम अवसरमोल यांच्याकडून मतदार यादी पुनरीक्षणाबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली तसेच मतदार यादीत नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. पांण्डेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून ही पहिलीच बुलडाणा जिल्हा भेट असून, त्या अनुषंगाने त्या अजून दोन भेटी देणार आहेत. 

*****

No comments:

Post a Comment