Tuesday 28 November 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रे'त ड्रोनच्या सहाय्याने नँनो युरीया फवारणी

 


 बुलडाणा, दि. २६ (जिमाका):  जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाली असून, या यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्यात येत आहे.

 
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सतर्फे नुकतेच बुलढाणा तालुक्यातील साखळी आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथे नॅनो युरियाचे ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ चे नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

 यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनाविषयी सादर माहिती देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजना, तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी विषयक तंत्रज्ञानाबाबत ( PM-PRANAM, नॅनो युरीया व ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर)ची माहिती देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ होईल. तसेच रथ यात्रेमध्ये ड्रोनद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक विजय बावीस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment