Friday 10 November 2023

 



विकसित भारत संकल्प यात्रा" मोहीम;

शासकीय योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा दि. 10 (जिमाका):  केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने "विकसित भारत संकल्प यात्रा" मोहीम केंद्र शासनाव्दारे राबवित आहे. ही मोहीम दि. 15 नोव्हेंबर 2023  ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी निर्देश दिले की, विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचावे. योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. सर्व शासकीय कार्यालयांनी ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर शिबिराचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संकलित करून ठेवावी. मोहीम कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश यावेळी दिले.

 

शासनाने राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे, 2018 या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून-ऑगस्ट, 2018  या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले होते. परन्तु अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment