Tuesday 7 November 2023

मत्स्य व्यवसायीकांसाठी घर-घर-किसान क्रेडीट कार्ड अभियान

 

मत्स्य व्यवसायीकांसाठी घर-घर-किसान क्रेडीट कार्ड अभियान

 

बुलढाणा दि. 7 (जिमाका):  राज्यातील मच्छिमार, मत्स्य शेतकरी व मत्स्यसंवर्धक यांना आवर्ती खर्च भागविण्याकरीता किसान क्रेडीट कार्ड ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मत्स्य व्यवसायीकांनी लाभ घेण्यासाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत घर-घर-किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसायचे सहायक आयुक्त सु.ग. गावडे यांनी दिली.

 

 

केंद्र शासनाचा मत्स्यपालन विभाग, मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालय, कृषी भवन, नवी दिल्ली यांच्यामार्फत घर-घर-किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय आयुक्त यांनी अभियान राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी शिबीर घेवून किसान क्रेडीट कार्ड तयार करुन देण्यात येत आहे. अद्यापपर्यंत 8 ठिकाणी शिबीर घेण्यात आले. तसेच शासन आपल्या दारी व देऊळगाव राजा येथील कृषी प्रदर्शन कार्यक्रमात विशेष कॅम्पचे अयोजन करुन 472 मच्छिमारांचे किसान क्रेडीट कार्ड अर्ज प्राप्त झाली आहे, अशी माहिती श्री. गावडे यांनी दिली.

 

राज्यातील मच्छिमार, मत्स्य शेतकरी व मत्स्यसवंर्धक यांना योजनेंतर्गत 60 हजार ते 1 लक्ष 50 हजार रुपये आवर्ती खर्च भागविण्याकरीता किसान क्रेडीट कार्ड अर्ज करता येवू शकेल. जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाशी संबधीत सर्व बांधवांनी केंद्र शासनाच्या किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसायचे सहायक आयुक्त सु.ग. गावडे केले.

00000

No comments:

Post a Comment