Thursday 16 November 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा; योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील





‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा;

योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा दि. 16 (जिमाका):  केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने "विकसित भारत संकल्प यात्रा" मोहीम केंद्र शासनाव्दारे राबवित आहे. ही मोहीम 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी मोहिम यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन करुन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाघ, जिल्हा क्रिडा अधिकारी बि.एस महानकर, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी निर्देश दिले की, विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचावे. योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. सर्व शासकीय कार्यालयांनी ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर शिबिराचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संकलित करून ठेवावी. मोहीम कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावे.

 

यात्रेमार्फत ग्राम स्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज अशा व्हॅन्स जिल्ह्यात येणार असून त्यांच्यामार्फत महानगरपालिका ते ग्रामीण स्तरावर केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी केली जाणार आहे. ही यात्रा पुढील टप्प्यात गावपातळी, सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणांनी करावी. या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.

000000 

No comments:

Post a Comment