Tuesday 7 November 2023

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजनेचा

 लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी यांचे निर्देश

बुलढाणा दि. 7 (जिमाका):- जिल्हास्तरीय आढावा समितीची सभा नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी बॅकांना दिले. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव उपस्थिती होते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही 18 ते 70 वयोगटासाठी असून त्यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये व कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयाचा विमा कवर मिळतो व त्याचा वार्षिक प्रीमियम हा फक्त 20 रुपये आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वयोगटासाठी असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मृत्यु झाल्यास 2 लाख रुपयाचा विमा कवर मिळतो व त्याचा वार्षिक प्रीमियम हा 436 रुपये आहे.

00000

No comments:

Post a Comment