Wednesday 22 November 2023

निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची हॉटीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, दि. 22 (जिमाका): सन 2023-24 मध्ये द्राक्ष व आंबा पिकाची शेत नोंदणी सुरु झाली असून, इतर पिकाची नोंदणी वर्षभर सुरु असते. सन 2023-24 मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटव्दारे नोंदणी करण्यासाठी 1.25 लाख लक्षांक सर्व संबधित जिल्ह्यांना वितरीत आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सध्या स्थितीत शेतनोंदणी अत्यंत अल्प झाली असून, निर्यातक्षम पिकांची शेतनोंदणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संबधित प्रणालीवर करावी, असे आवाहन फलोत्पादनाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.  

महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादन पिकांचे क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून, राज्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष, केळी, आंबा, डाळिंब, संत्रा व इतर फळ पिकाची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते. राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व कीड रोगमुक्तची हमी देण्यासाठी सन 2004-05 पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्धारित लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी.

सन 2022-23 मध्ये द्राक्षाची ग्रेपनेट प्रणालीवर 46097, आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर 1991, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर 8025 प्लॉटची नोंदणी केली होती. राज्यात सन 2022-23 मध्ये हॉर्टीनेट प्रणालीवर एकूण 73565 शेतकऱ्याची शेत नोंदणी झाली होती, ती देशाच्या तुलनेत 92 टक्के असून, राज्य निर्यातक्षम शेत नोंदणीत प्रथम स्थानी आहे.

*****

No comments:

Post a Comment