Thursday 2 November 2023

अतिवृष्टी नुकसान भरपाई देणे सुरु; ई-केवायसी अद्यावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई देणे सुरु;

ई-केवायसी अद्यावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

बुलढाणा दि. 2 (जिमाका):- जिल्ह्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर ई-केवाईसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

सन 2021, 2022 व 2023 याकालावधीमध्ये अतिवृष्टी, पुर, अवकाळी पाऊस, गारपीट व वादळीवारा यामुळे झालेल्या नुकसानीचे अर्थसहाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिबीटी प्रणालीमार्फत बॅक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर ई-केवाईसी करुन घ्यावी. जेणेकरुन लाभार्थाच्या बँक खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा करणे सोईचे होईल.

00000

No comments:

Post a Comment