Wednesday 8 November 2023

मध्यप्रदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणुक निमित्त बऱ्हाणपुर सिमेच्या परिसरात मद्य विक्री बंद

 

मध्यप्रदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणुक निमित्त

बऱ्हाणपुर सिमेच्या परिसरात मद्य विक्री बंद

 

बुलढाणा दि. 7 (जिमाका): मध्यप्रदेश राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2023 चा कार्यक्रम घोषीत झालेला आहे. त्यानुसार दि. 17 नोव्हेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने मध्यप्रदेश राज्यातील  बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरातील मद्य विक्री  बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

 

             मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरातील भागात मतदानाची वेळ संपण्यापुर्वी 48 तास अगोदर दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून बंद राहील. मतदानाच्या पूर्वीचा दिवस 16 नोव्हेंबर रोजी व मतदानाच्या दिवशी दि. 17 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा दिवशी बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरात मद्य विक्री बंद राहील. आदेशाची मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे  उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध दारु बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment