Thursday 23 November 2023

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 


बुलडाणा, दि. 23 (जिमाका): राज्य शासनाकडून आदिवासी उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेची विनामूल्य तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प येथे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार हा प्रशिक्षण कालावधी दि. 1 डिसेंबर 2023 ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा  1 हजार दराने विद्यावेतन देण्यात येते. तरी पात्र आदिवासी उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अटींची  पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत खालील पत्यावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग(जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड: http://rojgar.mahaswayam.in इत्यादी प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. उमेदवार निवडीसाठी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली असून, दि. 29 नोव्हें. 2023 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत.

आदिवासी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि.अमरावती येथे दि. 30 नोव्हें 2023 रोजी दु 12 वाजता मुलाखतीसाठी  मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे निवड यादी त्याच दिवशी दि. 30 नोव्हें. 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 07223-221205, मोबाईल 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

****

No comments:

Post a Comment