Thursday 2 November 2023

पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर

 

पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर

 

            बुलढाणा दि. 2 (जिमाका):-  निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा नवमतदार व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी निवडणूक विभागाव्दारे शनिवार दि. 4 नोव्हेंबर, रविवार दि. 5 नोव्हेंबर, सोमवार दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 ह्या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा, महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय,  निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जिल्ह्यामध्ये तहसिल व मंडळ स्तरावर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

  महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी    दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

 

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 27 ऑक्टोंबर रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत    दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

 

मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही तसेच दिनांक  1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ठ करणे, दुरुस्ती करणे (अस्पष्ट / चुकीचा फोटो, वय, पत्ता, नाव व इतर तपशिल) ई. प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी याबाबतचा लाभ घेण्याचे आवाहन उप जिल्हा  निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment