Thursday 23 November 2023

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज करा

 


        बुलडाणा, दि. 23 (जिमाका): माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दि. 20 नोव्हेंबर 2023 अखेर केवळ 4522 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ 8 ते 10 टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,  फ्रिशिपचे अर्ज तातडीने भरावेत. जेणे करुन शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड  यांनी केले आहे.

*******

No comments:

Post a Comment