Wednesday 22 November 2023

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

 बुलडाणा, दि. 22 (जिमाका): इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशासाठी 25 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित परीक्षेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी ते 8 वीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडून भरून ते प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहन व्यवहारे यांनी केले आहे.

 विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत शासकीय, अनुदानित आश्रम शाळा यांचेकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. परीक्षेचा अर्ज दि.1 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवेदन पत्र प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांनी सादर करावा. आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला सोबत जोडावा.

परीक्षेचे ठिकाण व वेळ

शासकीय आश्रमशाळा, कोथळी, ता. बार्शिटाकळी, जि.अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा असून, दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 6 वी करिता सकाळी 11 ते 1 व इयत्ता 7वी ते 9 वी करिता सकाळी 11 ते 2 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

*****


No comments:

Post a Comment