Thursday 9 November 2023

दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार

 

दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार

 

बुलडाणा दि. 9 (जिमाका): दिवाळी सण म्हटलं की, आनंदोत्सव आणि आप्त नातेवाईकांसोबत फराळाचा आनंद घेणे, ही आपली परंपरा आहे. परंतु नोकरी, शिक्षण व व्यवसाय निमित्त परदेशात राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. दिवाळी सणासाठी प्रत्येकाला स्वगावी येणे शक्य नसल्याने नातेवाईक परदेशातील आप्त, नातेवाईकांना फराळाचे पदार्थ टपाल सेवेव्दारे पाठवितात. टपाल विभागाचे दर स्वस्त असून सेवा विश्वसनीय आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आनंद वृध्दिंगत करणाऱ्या या सणात घरी तयार केलेला फराळ विदेशातील प्रियजनांना वाजवी दरात पाठविता येणार आहे. पार्सल पॅकिंग सुविधा बुलडाणा हेड पोस्ट ऑफिस आणि खामगाव हेड पोस्ट ऑफिस येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

 

0000

No comments:

Post a Comment