Tuesday 7 November 2023

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले

 

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले

बुलढाणा दि. 7 (जिमाका):  जिल्हा परिषद 20 टक्के सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एच.पी. विद्युत मोटार पंप, एच.डी.पी.ई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशीन पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी मागसवर्गीय शेतकरी व महिला लाभार्थ्यांनी परीपुर्ण अर्ज कागदपत्रासह संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे दि. 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत. योजनेचा लाभ जास्तीत जास्त मागासवर्गीय  शेतकऱ्यांनी, महिलांनी व महिला लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक भाग्यश्री विसपूते व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. मोहन व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केलेले आहे.

00000

No comments:

Post a Comment