Thursday 23 November 2023

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दाखवली हिरवी झेंडी

 

‘महा-रेशीम अभियान २०२४’ जनजागृतीस प्रारंभ

       बुलडाणा, दि.२३ (जिमाका) : ‘महा-रेशीम अभियान २०२४’ चा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रारंभ करण्यात आला. महा-रेशीम अभियानाचा चित्ररथ जिल्ह्यातील रेशीम शेतीसाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. 

 महा-रेशीम अभियानाचा हा प्रसिद्धी चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरून २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ दरम्यान जनजागृती करणार आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही. बी. ठाकरे, वरिष्ठ क्षेत्र सहायक नरेंद्रम भुरे, आशिष जोशी, बी. एल कुमावत, रेशीमचे सेवानिवृत्त सहायक संचालक राजाराम जोगदंड, प्राचार्य मुकुल पारवे, गळवे रेशीम चॉकी सेंटरचे जगदीश गुळवे उपस्थित होते.

जिल्ह्यातील ओलिताखालील सर्व शेतकरी ५००
रुपये नोंदणी शुल्क भरून रेशीम रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण महिन्याभरात देण्यात येणार आहे. जिल्ह्यात कृषि, जिल्हा पिरषदेचे पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडून संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार असून, जिल्ह्याला ६०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे.          00000

 

 

No comments:

Post a Comment