Monday 6 November 2023

थेट कर्ज योजना; 23 नोव्हेंबरला चिठ्ठीव्दारे होणार लाभार्थ्यांची निवड

 

थेट कर्ज योजना; 23 नोव्हेंबरला चिठ्ठीव्दारे होणार लाभार्थ्यांची निवड

 

बुलडाणा, दि‍.06 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थी निवड समितीव्दारे गुरुवार दि. 23 नोव्हेंबररोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे अर्जदाराची निवड चिठ्ठयाव्दारे होणार आहे. तरी अर्जदारांनी  बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

 

  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने अंतर्गत 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 या दरम्यान कर्जाची मागणी अर्ज स्विकारण्यात आले होते.  या योजने अंतर्गत एकूण 40 कर्ज मागणी अर्जास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 138 अर्ज असे एकूण 178 लाभार्थी निवड समितीने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये 129 पुरुष व 49 महिला आहे.  मान्यता प्राप्त लाभार्थ्यांपैकी 20 पुरुष व 20 महिला लाभार्थीची निवड चिठ्ठयाव्दारे होणार आहे. निवड झाल्यानंतर वैधानिक दस्तऐवजाची  पुर्तता झाल्यानंतर कर्ज वितरण करण्यात येईल. पात्र अर्जाची यादी महामंडळ कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

000000

No comments:

Post a Comment