Posts

Showing posts from November, 2023

मतदान नवीन मतदार नोंदणीवर विशेष भर द्या - विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय

Image
  ·          सहायक निवडणूक अ‍धिकारी यांच्याकडून घेतला कामाचा आढावा ·          एकही नवीन मतदार नोंदणीपासून सुटू नये ·          विशेष शिबिराच्या माध्यमातून नोंदणी वाढविण्याचे दिले निर्देश ·            मतदार नाव नोंदणी प्रक्रियेस गती द्या बुलडाणा,दि.30(जिमाका): आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, सध्या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या विशेष मोहिमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवीन मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत त्यांची नावनोंदणी करून घेण्यावर भर देण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय मतदार यादी पुनरीक्षणाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.       ...

मतदान केंद्रांची डॉ. निधी पांण्डेय यांच्याकडून पाहणी

Image
  बुलडाणा, दि. 30 (जिमाका): दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली.              जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधा र) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 182, 183 आणि 184ची पाहणी करत केंद्रप्रमुखांकडून मतदार यादी पुनरीक्षण आणि नवीन मतदार नावनोंदणी, वगळणी, मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली. तसेच जिजामाता महाव...

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मदत घ्या - मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय

Image
  बुलडाणा, दि.30(जिमाका):   दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मतदार नोंदणीमध्ये मदत घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दि ले. श्रीमती डॉ. पांण्डेय या मतदार यादी निरीक्षक म्हणून त्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.   जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व विविध पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात विशेष शिबिरांमधून नव मतदारांची जिल्हा प्रशासन आणि नि...

दत्तक विधान प्रक्रिया समजून घ्या – जिल्हा बाल संरक्षण अ‍धिकारी

  बुलडाणा, दि. 30(जिमाका):   बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.              भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नीची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेणेसाठी बालकाचे वय 2 वर्षाच्या आत असावे. भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 85 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असावी.   बालकाचे वय 2 वर्ष ते 4 वर्षापर्यंतचे बालक, भावी दत्तक माता पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 90 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी...

शासकीय मुलींचे वसतीगृहात दूध पुरवठ्यासाठी दरपत्रक आमंत्रित

बुलडाणा, दि. 30(जिमाका):   समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने, नवीन) बुलडाणा वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना दररोज प्रती विद्यार्थिनी 200 मिली साखरयुक्त दूध पुरवठा करण्याकरिता स्थानिक पातळीवरून निवेदिता मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी शासन नियमांच्या अधिन राहून दि. 1 ते 6 डिसेंबर 2023 पर्यंत बंद पाकीटात वसतीगृहाच्या कार्यालयात या निवेदिता सादर कराव्यात असे आवाहन, शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे. ******

सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Image
·           यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक ·           यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना ·          मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका): जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून, त्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि नियोजनानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे दिले.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृह येथे आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीचा समन्वय समितीतील सदस्यांचा त्यांनी आज आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात यात्रा महोत्सव राहणार असून, त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, दर्गा ट्रस्ट आणि पिंपळगाव सराई ग्रामपंचायत ...

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा अन् 35 टक्के अनुदान मिळवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

  बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका): प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत उन्नयन योजना ही संघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेत 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि नाशवंत शेतीमाल उद्योगासाठी 10 लाखांच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान कृषी विभागाद्वारे दिले जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी विकास साधणार आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊन 10 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, असे आवाहन जिल्हा‍धिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   असंघटित अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये खूप अडचणी आहेत. ज्यामध्ये संबंधित उद्योजक बाहेरून कर्ज घेण्यास पात्र नाहीत, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च व मानांकनाचा अभाव असतो. त्यामुळे सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये संत्रा, डाळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामार्फत ...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी व्हा

  बुलडाणा, दि.29 (जिमाका) : कोणत्याही बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकाचे वय 18 ते 70 दरम्यान आहे, अशा नागरिकाने बचत खाते असलेल्या बँक शाखेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये त्यांची नोंदणी झाली आहे, याची खात्री करून घ्यावी व त्यानुसार आपल्या पासबूक मध्ये त्यांची एंट्री करून घ्यावी. जर नोंदणी झाली नसेल तर त्यांनी ती तत्काळ करून घ्यावी. या योजनेअंतर्गत 20 रुपये वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयांचा अपघाती विमा कवर होते जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसास मिळतात व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखाचा विमा मिळतो, तरी जिल्ह्यातील सर्व बँक खाते असलेल्या नागरिकांना याची पडताळणी करून घेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे. *****

रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन

  •         शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित •          राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य स्पर्धा   बुलडाणा, दि.29 (जिमाका) : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश असून, रब्बी हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.   राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादकता वाढवत आहेत. अशा शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, ...

जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबर रोजी

  बुलडाणा, दि. 29(जिमाका): सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हा लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी (सोमवार) दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.   त्याबाबत अर्जदारांना लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास, तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सदर तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त अहवालानुसार समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल आणि टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत अर्ज पाठविणे आवश्यक राहील तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावी अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे. *****

बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण

                        बुलडाणा, दि. 28 (जिमाका):  महाराष्ट्र उद्योजकता विकास कें द्रा द्वा रे  जिल्हा उद्योग कें द्रा मार्फत उद्योग ,  व्यवसाय सुरु करू इच्छिणा ऱ्या  सुशिक्षित बेरोजगार युवक - युव तीं साठी बुलडाणा येथे कुक्कट पालन  व पशुपालनात  शेळी ,  गा ई  आणि म्हशी पाल नाच्या  प्रशिक्ष णाचे  आयोजन दि  6  ते  10 डिसेंबर 2023   या  कालावधी त  करण्यात आले आहे.  तरी जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगा रांनी  तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत : चा उद्योग सु रू करणे हा या  प्रशिक्षणाचा मुख्य उद्दे श   असल्यामुळे या  प्रशिक्षणात शेळीपालन , कुक्कट  आणि गा ई ,   म्हशी  पालनाचे तंत्र आणि प्रकार ,  त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चा ऱ्या चे प्रकार  व उद्योग सुरू करण्यासाछर संपूर्ण सहकार...

थेट कर्ज योजने अंतर्गत लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

बुलडाणा, दि. 28 (जिमाका):  साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने अंतर्गत जिल्हा कार्यालयास 40 एकूण लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले होते. शासन निर्णयानुसार पात्र कर्ज मागणी अर्जामध्ये 129 पात्र पुरुषांच्या अर्जापैकी 20 पुरुष अर्जदाराची निवड करण्यात आली, 49 पात्र महिलांच्या अर्जापैकी 20 महिला अर्जदाराची निवड करण्यात आली. लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार चिठ्ठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात निवड करण्यात आली. सदर बैठकीला लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांच्यासह महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे उपस्थित होते. सदर बैठकीला जिल्ह्यातील अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते सर्व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****  

गुटखा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

बुलडाणा, दि. 28 (जिमाका): नांदुरा येथे जळगाव जमोद रोडवरील विशाल जैन यांच्या   गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सोळंके व गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदिप सुर्यवंशी, अजाबराव घेवंदे, नमुना सहायक आशिष देशमुख यांच्या पथकाने छापा मारुन 1 लक्ष 62 हजार 800 रुपये किंमतीचा पानमसाला व सुंगधीत तंबाखूचा साठा जप्त केला. राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुपारी व तत्सम तंबाखुजन्य पदार्थांविरुद्ध प्रतिबंध घालण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा अत्राम तसेच अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत अन्नपदार्थ विक्रीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 188,273 व 328 तसेच अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 59 नुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या प्रकरणीमध्ये दसरखेड, टोलनाका, मलकापूर, गाडी क्र. एमएच 21, बीएच 15 गाडीची त...

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा - सहायक आयुक्त प्रवीण खंडारे

  बुलडाणा, दि.28(जिमाका) :   राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी   कौशल्य, रोजगार उ द्यो जकता व नाविण्यता   विभा गा द्वारे   पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार   योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार   मेळाव्याचे   नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी   आयोजन करण्यात   आले आहे.   या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून   तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभागाच्या माध्यमा तू न क रण्यात येत   आहे.                  कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभाग   मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या   निर्देशाप्रमाणे     दोन   दिवसीय     मेळावा   आयोजित करण्यात आला आहे.   राज्यभरातून विविध   क्षेत्रातील किमान 100 कंपन्या या   महारोजगार मेळाव्यात सहभा गी होणार आहेत.     त्याअनुषंगाने जिल् ह् यातील   कुशल मनुष्यबळाची गरज असेलल्या क...

भारतीय‌ संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Image
  बुलडाणा, दि.२६ (जिमाका): भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांना शपथ देत उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी तहसीलदार श्रीमती माया माने, नायब तहसीलदार संजय बंगाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, रवी लहाने इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव संविधान दिवसाची शपथ दिली. *****  

‘विकसित भारत संकल्प यात्रे'त ड्रोनच्या सहाय्याने नँनो युरीया फवारणी

Image
    बुलडाणा, दि. २६ (जिमाका):   जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाली असून, या यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्यात येत आहे.   राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सतर्फे नुकतेच बुलढाणा तालुक्यातील साखळी आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथे नॅनो युरियाचे ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ चे नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.   यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनाविषयी सादर माहिती देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजना, तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी विषयक तंत्रज्ञानाबाबत ( PM-PRANAM, नॅनो युरीया व ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर)ची माहिती देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ होईल. तसेच रथ यात्रेमध्ये ड्रोनद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक विजय बावीस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. *****

मतदार यादी निरीक्षक म्हणून डॉ. निधी पांडे यांचा जिल्हा दौरा

  बुलडाणा, दि. २५ (जिमाका): दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यास तीन भेटी देणार असून, गुरुवार (दि.३०) रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौ-यावर येत प्रथम भेट देणार आहेत.   या भेटीच्या अनुषंगाने दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवार (दि.३०) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये राजकीय पक्षांसोबत बैठक घेतील.   मतदार यादी निरीक्षक डॉ. पांडे बुलढाणा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांनाही भेटी देणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे. ***** ...

मंजूर निधीनुसार सर्व विकास कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

Image
    बुलडाणा, दि. 24 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर तरतुदीनुसार आतापर्यंत झालेल्या खर्चाचे प्रमाण कमी आहे. अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यताही अद्यापपर्यंत झालेल्या ना हीत, ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून कामांना चालना द्यावी.   नियोजित विकासकामांसाठीचा मंजूर निधीनुसार सर्व विकास कामे   31 मार्चपूर्वी करा, असे आदेश राज्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे दिले.   पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.              या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, डॉ. संजय कुटे आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत जिल्हा वार्षि‍क योजनेच्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदि...

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा - सहायक आयुक्त प्रवीण खंडारे

  बुलडाणा , दि.24(जिमाका) : राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  कौशल्य, रोजगार उ द्यो जकता व नाविण्यता विभा गा द्वारे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून  तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभागाच्या माध्यमा तू न क रण्यात येत आहे.                 कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशाप्रमाणे हा दोन   दिवसीय    मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध   क्षेत्रातील किमान 100 कंपन्या या   महारोजगार मेळाव्यात सहभा गी होणार आहेत.   त्याअनुषंगाने जिल् ह् यातील   ज्या कंपनी , उदयोजक , आस्थापनाकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल अशा सर्व आस्थापनांनी सदर महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी   होऊन   रिक्तपदांबाबतची ...

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगाने पूर्ण करा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

Image
  बुलडाणा, दि. 23 (जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22 टक्के कमी झाला असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.   पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणीनिश्चिती व दुष्काळ व्यवस्थापनाची आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.   या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,   मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते.   जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांनी दक्ष राहून उपलब्ध पाण्याचा वारंवार आढावा घेऊन आवश्यकता असल्यास टँकरचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचे पाणी, जनावर...

विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांपर्यंत योजना पोहचवा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

Image
  जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ   बुलडाणा, दि.२३(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बुलडाणा जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धीरथांना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची यशस्वीपणे प्रचार व प्रसिद्धी व्हावी, त्यातून त्यांना याबाबत माहिती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण...