चिखली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन
चिखली येथील शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 04 : चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था येथे शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन
करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजक नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता
आणि नाविन्यता विभागाचे मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्यभिषेक
साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथि म्हणून
आमदार श्वेताताई महाले, आयएमसी अध्यक्ष सुधीर तांबट तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ. केदार
ठोसर, प्रशांत देशमुख प्रशिक्षणार्थ्यांना नागरी कर्तव्य व शिष्टाचार, स्वदेशी विचारांचा
प्रचार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, याबाबत मार्गदर्शन करणार आहे. तरी या कार्यक्रमास
माजी प्रशिक्षणार्थी व पालकांनी तसेच चिखली तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे
आवाहन शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment