राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज आमंत्रित
राजर्षी
शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व
कलावंत
मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा,
दि. 26 : सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या शासन निर्णयान्वये
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत
जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी या चालू आर्थिक वर्षासाठी
अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या साहित्यिक व
कलावंतांनी https://mahakalasanman.org/
या
योजनेचे नियम व अटी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या क्रमांक दि. 2 जून
2025 पत्रामध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेले आहेत. अर्ज करताना अर्जदारांनी या
नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. फक्त नियम व अटींची पूर्तता करणारे आणि
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेले अर्जच ग्राह्य धरले जातील. अपूर्ण व मुदतीनंतर
प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जिल्ह्यातील
सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज
ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले
आहे.
00000
Comments
Post a Comment