शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा उत्साहात

 






शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा उत्साहात

बुलढाणा, दि.२७ जिमाका: कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा मौजे मुरादपूर येथील शेतकरी रामेश्वर इंगळे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडली.

सभेचे अध्यक्षस्थान विष्णूभाऊ गाडेकर यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे,  कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, विशेषज्ञ डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, डॉ. जगदीश वाडकर, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष विजय भुतेकर, स्वप्नील महाजन उपस्थित होते.

या वेळी डॉ. अमोल झापे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची संकल्पना व उद्दिष्ट स्पष्ट करताना, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामागील उद्देश अधोरेखित केला. त्यांनी खरीप पिकासाठी उपयुक्त अशा कृषी निविष्ठांबाबतही माहिती दिली.

डॉ. दिनेश कानवडे यांनी खरीप पीक लागवडीच्या नव्या तंत्रज्ञानांवर सखोल मार्गदर्शन करताना मका पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भातही महत्वपूर्ण माहिती दिली. तर स्वप्नील महाजन यांनी ‘शून्य मशागत तंत्रज्ञान’ या पर्यावरणपूरक शेतीपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. दत्तात्रय टेकाळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पशुधन व्यवस्थापन व दुग्धव्यवसाय यावर मार्गदर्शन केले.

सभेनंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात खरीप पिकांवरील कीड-रोग नियंत्रणाबाबत खुली चर्चा झाली. यानंतर सर्व मान्यवरांनी श्री. इंगळे यांच्या टोमॅटो लागवड प्रक्षेत्रास भेट देत प्रत्यक्ष निरीक्षण केले व इंगळे यांच्याकडून टोमॅटो लागवडीविषयी माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. जगदीश वाडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर इंगळे, भारत परिहार, उमेश गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या