स्वाधार योजना; 10 जूनपर्यंत अर्जातील त्रूटीची पुर्तता करा

 

स्वाधार योजना; 10 जूनपर्यंत अर्जातील त्रूटीची पुर्तता करा

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या संकेतस्थळावर 15 मार्च पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन प्रणालीवर भरलेले आहेत, त्या सर्व अर्जांची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांनी दि. 10 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्रूटीची पुर्तता करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच भोजन, निवास व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. इ. 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 मार्च पर्यंत वाढविण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रृटीमध्ये आहेत त्यांनी दिनांक 10 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने त्रृटी पुर्ण करण्याकरीता अंतिम मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत त्रूटी पुर्ण करुन अर्ज फेरसादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील, याची नोंद घ्यावी. तसेच स्वाधार योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लॉग इनमध्ये बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला असून बँक तपशिल भरण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या