बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन
बाल कामगार प्रथा
विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : जागतिक
बालकामगार विरोधी दिन दि. 12 जुन रोजी संपूर्ण जगात पाळला जातो. हा दिवस 2002 पासून
पाळण्यात येत असून या दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी म.तु. जाधव यांच्याद्वारे
बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटनांच्या
पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करुन त्यामध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, व्यापारी
संस्था व इतर सर्व आस्थापनांच्या व्यापारी बंधुना बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द
माहिती देवून तसेच त्यांना बाल मजुरी निर्मुलनाचे महत्व समजावुन सांगण्यात येवुन जनजागृती
करण्यात येणार आहे.
आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत व यापुढेही बालकामगार
ठेवणार नाही, असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरुन घेण्यात येईल. कोणत्याही आस्थापनेने
18 वर्षाखालील बालक किंवा किशोरवयीन बालकास आपल्या आस्थापनेवर कामास ठेवू नये, ठेवल्यास
सदर आस्थापनेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
लहान वयात काम केल्यामुळे बालकांच्या त्वचा, श्वसनमार्ग
संस्था, मेंदु, जठर संस्था यावर विपरीत परीणाम होतो. त्यांची मानसिक, शारीरीक व बौध्दीक
वाढ खुंटते. चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे, तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने
व मदतीने त्यांना मिळाला पाहीजे. या निमित्ताने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमेमध्ये
सुध्दा जागरुक नागरीक म्हणुन सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी
म.तु. जाधव यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment