क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

 

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

बुलडाणा, दि. 24 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने क्षय आरोग्य धाम, बुलडाणा येथे रुग्णालय परिसरात योगासन व ध्यान योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण होते. कार्यक्रमाला डॉ. कोठारी सर, डॉ. हेलगे मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरोपॅथीतज्ञ डॉ. मंजू जाधव यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात परिसरातील अधिकारी, परिसेविका, कार्यालयीन लिपिक वर्ग, पॅरामेडिकल स्टाफ, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.डॉ. मंजू जाधव मॅडम यांनी योग म्हणजे काय, अष्टांग योग, यम-नियम, आहार-विहार आदी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. योगशिक्षिका कु. कालींदा जायभाये यांनी "कर्मयोगी व्हा आणि कामासोबत योगाची सांगड घाला" या उक्तीला अनुसरून सूक्ष्म हालचालींचे महत्त्व, त्याचे फायदे, काळजी व लाभ याविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थनेने झाली. यानंतर शरीराच्या सूक्ष्म हालचाली, विपरीत स्थिती, दंड स्थिती, बैठक स्थिती व शयन स्थितीत विविध योगासने करण्यात आली. प्राणायाम, कपालभाती, त्राटक, शोधन मुद्रासहित भ्रामरी, ध्यान, धारणा व संकल्प घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठ व सामूहिक जेवणाने करण्यात आला.

सदर कार्यक्रम योग दिनाच्या निमित्ताने योगाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने यशस्वीरीत्या संपन्न झाला असून, यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या