शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑलिम्पिक डे साजरा करण्याचे आवाहन
शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑलिम्पिक डे साजरा करण्याचे
आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : दरवर्षी
23 जून हा दिवस “ऑलिम्पिक डे”
म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्था,
कनिष्ठ महाविद्यालय, ए.सी.सी.सी., नेहरू युवा केंद्र व विविध संघटनांनी ऑलिम्पिक डे
उत्साहात साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जगातील
सर्वोत्तम क्रीडा महोत्सव समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे 23 जून
1984 रोजी पियरे डी कौबर्टिन यांनी केली. याच पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालय
व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जून २०२५ रोजी स.
प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे राज्यस्तरीय ऑलिम्पिक डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चर्चासत्र, परिसंवाद,
कार्यशाळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन ऑलिम्पिक डे साजरा करावा. विद्यार्थ्यांमध्ये
क्रीडाबाबत जागरूकता निर्माण करून, खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व
अधोरेखित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment